News Flash

अनंतनाग, शोपियानमध्ये ११ दहशतवाद्यांचा खात्मा; ३ जवान शहीद

दोन ठिकाणी अजूनही चकमक सुरु आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान येथे शनिवारी रात्रीपासून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान येथे शनिवार रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत ११ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून दोन ठिकाणी अजूनही चकमक सुरु आहे. यामध्ये तीन जवानही शहीद झाले आहेत.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान येथे शनिवारी रात्रीपासून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरु केली होती. शोपियान आणि अनंतनाग जिल्ह्यातील एकूण तीन ठिकाणी दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यातील पहिली चकमक अनंतनागपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दियालगाम येथे झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. रौफ बशिर शेख असे या मृत दहशतवाद्याचे नाव असून त्याचा साथीदार आमिरला पोलिसांनी अटक केली आहे. रौफ गेल्याच महिन्यात दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. ते दोघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते.

अनंतनागपाठोपाठ शोपियान जिल्ह्यातूनही चकमकीचे वृत्त समोर आले आहे. या जिल्ह्यात दोन ठिकाणी चकमक सुरु आहे. या चकमकींमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून यात सात जणांचा खात्मा देखील करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.  या तीन चकमकींमध्ये ३ जवान जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 9:22 am

Web Title: jammu and kashmir terrorists killed in three encounters at anantnag and shopian dragad kachdoora
Next Stories
1 आजपासून एसबीआय ग्राहकांसाठी हे तीन नियम बदलणार
2 मद्यपींना निवडणूक लढवण्यास बंदी
3 अमिताभ बच्चन यांच्यामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला अटक करण्यात यश
Just Now!
X