News Flash

मुकेश अंबानी २०३३ पर्यंत होणार भारतातील पहिले ट्रिलिअनर पण त्यापूर्वी…

एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे २०३३ पर्यंत ट्रिलिअनर बनतील. परंतु त्यापूर्वी २०२६ मध्ये अॅमेझॉनचे संस्थापन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे ट्रिलिअनर बनणार असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. कंपॅरिझननं केलेल्या एका सर्वेक्षणातील अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

बेझोस यांचं सध्याचं वय ५६ वर्षे आहे. तर फोर्ब्सनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे आता १४२.८ अब्ज डॉलर्सचं नेट वर्थ आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कंपॅरिझनच्या अहवालानुसार ते २०२६ पर्यंत ट्रिलिअनर बनतील. तसंच २०२६ पर्यंत त्यांचं नेटवर्थ १ हजार अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यावेळी त्यांचं वय हे ६२ वर्षे असेल. अहवालानुसार बेझोस यांच्या नेट वर्थमध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच त्यांच्यानंतर चीनच्या एवरग्रँडचे प्रमुख शु जियाइन हे २०२७ पर्यंत तर अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा हे २०३० पर्यंत ट्रिलिअनर बनणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, कंपॅरिझनच्या अहवालानुसार रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे २०३३ मध्ये ट्रिलिअनर बनतील. त्यांच्याकडे सध्या ४९.२ अब्ज डॉलर्सची नेट वर्थ आहे. कंपॅरिझनने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड सर्वाधिक व्हॅल्यू असलेल्या २५ कंपन्यांचं विश्लेषण केलं आहे. यासोबतच त्यांनी फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत २५ लोकांच्या नेट वर्थचंही विश्लेषण करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या गेल्या पाच वर्षातील नेट वर्थमधील वार्षिक वाढीच्या सरासरीच्या आधारावर हा अहवाल लागू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 4:29 pm

Web Title: jeff bezos amazon ceo to become first trillionaire according to report reliance industries mukesh ambani till 2033 jud 87
Next Stories
1 नवऱ्याने AC रुममध्ये झोपू दिले नाही म्हणून बायकोची गळफास घेऊन आत्महत्या
2 “महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे…”; राहुल गांधींची मोदी सरकारकडे मागणी
3 भारताने लॉकडाउननंतर रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास टळू शकतो करोनाचा धोका
Just Now!
X