News Flash

भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, पगार ३६ हजार रूपये

१२ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

प्रातिनिधिक छायाचित्र

‘नॉर्थ वेस्टर्न रेल्वे’ (NWR) मध्ये १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठीची जाहिरात देण्यात आली आहे. ‘अमर उजाला’ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार ७ ते ८ पदांसाठी जागा रिक्त आहेत. एकूण ३०७ जागा भरायच्या असल्याने ही जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. पगार, एकूण पदे, निवड प्रक्रिया आणि नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराने अर्ज करायचा आहे.

कोणती पदे रिक्त– स्टाफ नर्स, क्लार्क, स्टेनोग्राफर, असिस्टंट लोको पायलट, तिकीट तपासक, गुड्स गार्ड, ज्युनियर इंजिनिअर (सिग्नल) आणि इतर

वयाची मर्यादा– १८ वर्षे ते ४२ वर्षे वयाच्या व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता– सरकारी मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेतून १२ वी पास असणे गरजेचे, डिप्लोमा आणि डिग्री असलेल्यांना प्राधान्य

नोकरीचे ठिकाण-देशभरात कुठेही

अर्ज कसा कराल-इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाईटवर क्लिक करून नोकरीसाठीचा ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. तसेच आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी अटेस्टेड करून यासोबत जोडायच्या आहेत. ही सगळी आवश्यक कागदपत्रे Principal North Central Railway Collage Tundla, District Firozabad, Pin – 283204 (UP) या पत्त्यावर पाठवायची आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख– १२ ऑक्टोबर २०१७

नोंदणी शुल्क– कोणत्याही वर्गासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क भरायचे नाही.

पगार – ५२००-२०२०० रूपये प्लस ग्रेड पे १९००/२८०० आणि ९३००-३६००० रूपये प्लस ग्रेड पे ४६००/४२००

वेबसाईटhttp://www.nwr.indianrailways.gov.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2017 1:49 pm

Web Title: jobs in indian railway for 12th passed36000 salary
टॅग : Indian Railways
Next Stories
1 आझम खान यांच्या ‘उर्दू गेट’वर योगी सरकार चालवणार बुलडोझर
2 भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतले
3 राम रहिम, हनीप्रीतकडे संयुक्त राष्ट्र संघानं मागितला पाठिंबा
Just Now!
X