ज्येष्ठ राजकारणी के.पी. शर्मा ओली यांची रविवारी नेपाळचे ३८ वे आगामी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. थेट लढतीत त्यांनी विद्यमान पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव केला. देशाच्या नव्या घटनेवरून हिंसक निदर्शने सुरू असतानाच पंतप्रधानपदाबाबत सहमती घडवून आणण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी निवडणूक आवश्यक ठरली होती.
संसदेत झालेल्या मतदानामध्ये सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेले ओली यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २९९ मतांपेक्षा ३९ अधिक, म्हणजे ३३८ मते मिळवली. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला केवळ २४९ मते मिळवू शकले.