News Flash

कन्हैयाकुमारने उपोषण सोडले

जेएनयू संकुलातील शैक्षणिक वातावरण दूषित होऊ नये आणि शांतता भंग होऊ नये

| May 8, 2016 02:51 am

कन्हैय्याकुमार

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याला शनिवारी एम्स रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्यानंतर त्याने गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
जेएनयू संकुलातील शैक्षणिक वातावरण दूषित होऊ नये आणि शांतता भंग होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला संकुलात निमंत्रित करू नये, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. जेएनयूमधील पाच विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आपले उपोषण सोडले होते.
मात्र १५ विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू ठेवले होते. कन्हैयाकुमारला शुक्रवारी अर्धबेशुद्धावस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्याला घरी पाठविण्यात आले असून काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. प्रकृतीचा विचार करून कन्हैयाकुमारने उपोषण सोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2016 2:51 am

Web Title: kanhaiya kumar hunger strike end
टॅग : Kanhaiya Kumar
Next Stories
1 पैशाबाबत नकारात्मक भावना सोडा!
2 पुलवामात चकमकीत हिज्बुलचे तीन दहशतवादी ठार
3 लंडनचे महापौर सादिक खान यांचा शपथविधी
Just Now!
X