बिहार निवडणुकीच्या प्रचारसभांत विरोधकांवर सुरू केलेला टीकेचा भडीमार कायम राखत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ससाराम येथील सभेत राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लक्ष्य केले. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले लालूप्रसाद यंदाच्या निवडणुकीपासून दूर का? कारण, त्यांना बिहार रिमोट कंट्रोलने चालवायचे आहे. लालूप्रसाद स्वत:ला ‘बिग बॉस’ समजतात, असा घणाघात मोदींनी केली. सत्तेत येण्याची भूक मिटवण्यासाठी लालूप्रसाद आणि नितीश कुमार एकत्र आले आहेत, असेही मोदी पुढे म्हणाले. गेल्या साठ वर्षांत यांनी केलेल्या सर्व चुका सुधारण्यासाठी मला फक्त साठ महिन्यांचा कालावधी द्या, असे आवाहन मोदींनी बिहारमधील जनतेला यावेळी केले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2015 रोजी प्रकाशित
लालूप्रसाद स्वत:ला ‘बिग बॉस’ समजतात- नरेंद्र मोदी
भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले लालूप्रसाद यंदाच्या निवडणुकीपासून दूर का?
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 09-10-2015 at 14:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad wants to run bihar with remote control he thinks he is big boss says pm modi