News Flash

लांस आर्मस्ट्रांगने विन्फ्रे सोबतच्या मुलाखतीत उत्तेजन द्रव्य घेतल्याची कबूली दिली

ऑपरा विन्फ्रेसोबतच्या मुलाखतीमध्ये उत्तेजन द्रव्य घेतल्यावरून कुप्रिध्दी मिळालेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंगने लिवस्ट्रॉंग चॅरिटीच्या स्टाफ सोबत व्यक्तिगतपातळीवर माफी मागीतली आहे. लिवस्ट्रांगचे प्रवक्ते रे बाजारे यांनी सांगितले

| January 15, 2013 01:05 am

ऑपरा विन्फ्रेसोबतच्या मुलाखतीमध्ये उत्तेजन द्रव्य घेतल्यावरून कुप्रिध्दी मिळालेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंगने लिवस्ट्रॉंग चॅरिटीच्या स्टाफ सोबत व्यक्तिगतपातळीवर माफी मागीतली आहे.
लिवस्ट्रांगचे प्रवक्ते रे बाजारे यांनी सांगितले की, ‘‘ लांस आज लिवस्ट्रांग फाउंडेशनच्या मुख्यालयात आले होते. त्यांनी स्टाफची भेट घेतली आणि त्याच्यामुळे झालेल्या मनस्थापाबद्दल माफी मागितली.
त्यांनी म्हटले की, आर्मस्ट्रॉंगने लिवस्ट्रांगच्या स्टाफला कर्करोगींसाठी अशाचप्रकारे मन लावून काम करत राहण्याचा सल्ला दिला.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानूसार आर्मस्ट्रॉंगने विन्फ्रेसोबत झालेल्या मुलाखतीमध्ये उत्तेजन द्रव्य घेतल्याची कबूली दिली आहे.
आस्टिन स्थित आर्मस्ट्रॉंगच्या घरबाहेर सकाळपासून पत्रकार, छायाचित्रकार आणि टीवी कॅमेरे यांचा ताफा लागला होता. विन्फ्रेसोबत त्याची मुलाखत  सोमवारी प्रसारित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:05 am

Web Title: lance armstrong admits to doping charge at oprah winfreys show
Next Stories
1 शियांच्या हत्याकांडाप्रकरणी बलुचिस्तान सरकार बरखास्त
2 स्वतंत्र तेलंगणा लवकरच?
3 अलाहाबाद येथे कुंभमेळ्याला सुरुवात
Just Now!
X