News Flash

७१ वर्षांत ‘या’ २२ मुख्यमंत्र्यांनी केलं कर्नाटकवर राज्य

येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या ७१ वर्षांत  २२ मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकवर राज्य केलं आहे. हे मुख्यमंत्री  कोणते ते जाणून घेऊयात.

सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

भाजप  आणि काँग्रसनं  अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या कर्नाटक निवडणूकीत अखेर भाजपानं बाजी मारली.  बहुमतचा आकडा गाठण्यास भाजप अशस्वी ठरली तरी कर्नाटकात सत्तेच ‘कमळ’ फुलवण्यास भाजपला यश आलं. भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पांनी तिसऱ्यांदामुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या ७१ वर्षांत  २२ मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकवर राज्य केलं आहे. हे मुख्यमंत्री  कोणते ते जाणून घेऊयात.

१. के चेंगलाराय रेड्डी. ते कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते. 

कार्यकाळ : २५ ऑक्टोबर १९४७ ते  ३० मार्च १९५२

पक्ष : काँग्रेस

२. के. हनुमंत्याह

कार्यकाळ :   ३० मार्च १९५२ ते १९ ऑगस्ट  १९५६

पक्ष : काँग्रेस

३. के मंजप्पा

कार्यकाळ :   १९ ऑगस्ट  १९५६ ते ३१ ऑक्टोबर १९५६

पक्ष : काँग्रेस

 

४. एस निजलिंगप्पा (एकूण चारवेळा मुख्यमंत्री पद भूषवले)

कार्यकाळ :   १ नोव्हेंबर १९५६ ते १० एप्रिल १९५७

१० एप्रिल १९५७ ते १६ मे १९५८

२१ जून १९६२ ते ३ मार्च १९६७

३ मार्च १९६७ ते  २९ मे १९६७

पक्ष : काँग्रेस

५. बी डी जट्टी

कार्यकाळ : १६ मे १९५८ ते ९ मार्च १९६३

पक्ष : काँग्रेस

६. एस आर कान्थी

कार्यकाळ : २४ मार्च १९६२ ते  २० जून १९६२

पक्ष : काँग्रेस

७. विरेंद्र पाटील

कार्यकाळ : २९ मे १९६८ ते १८ मार्च १९७१

३० नोव्हेंबर १९८९ ते १० ऑक्टोबर १९९०

पक्ष : काँग्रेस

 

८. डी देवराज उर्स ( एकूण २ वेळा मुख्यमंत्री झाले)

कार्यकाळ : २० मार्च १९७२ ते ३१ डिसेंबर १९७७

२८ फेब्रुवारी १९७८ ते  ७ जनवरी १९८०

पक्ष : काँग्रेस

९. आर गुंडू राव

कार्यकाळ : १२ जानेवारी १९८० ते  ६ जानेवारी १९८३

पक्ष : काँग्रेस

१०. रामकृष्ण हेगडे 

कार्यकाळ : १० जानेवारी १९८३ ते २९ डिसेंबर १९८४

८ मार्च १९८५ ते १३ फेब्रुवारी १९८६

१६ फेब्रुवारी १९८६ ते १० ऑगस्ट १९८८

पक्ष : जनता दल (सेक्युलर )

११. एस आर बोम्मई

कार्यकाळ : १३ ऑगस्ट १९८८ ते २१ एप्रिल १९८९

पक्ष : जनता दल (सेक्युलर )

१२. एस बंगरप्पा

कार्यकाळ : १७ ऑक्टोबर १९९० ते १९ नोव्हेंबर १९९२

पक्ष : काँग्रेस

१३. वीरप्पा मोइली

कार्यकाळ : १९ नोव्हेंबर १९९२ ते ११ डिसेंबर १९९४

पक्ष : काँग्रेस

१४. एच डी देवगौड़ा

कार्यकाळ : ११ डिसेंबर १९९४ ते ३१ मे १९९६

पक्ष : जनता दल (सेक्युलर )

१५. जे एच पटेल

कार्यकाळ : ३१ मे १९९६ ते ७ ऑक्टोबर १९९९

पक्ष : जनता दल (सेक्युलर )

१६. एस एम कृष्णा

कार्यकाळ : ११ ऑक्टोबर १९९९ ते २८ मे २००४

पक्ष : काँग्रेस

१७. एन धरम सिंह

कार्यकाळ : २८ मे २००४ ते २७ जानेवारी २००६

पक्ष : काँग्रेस+जनता दल (सेक्युलर ) काँग्रेस

१८. एच डी कुमारस्वामी

कार्यकाळ : ३ फेब्रुवारी २००६ ते ८ फेब्रुवारी २००७

पक्ष : जनता दल (सेक्युलर ) +काँग्रेस युती

१९. येडियुरप्पा

कार्यकाळ : १२ नोव्हेंबर २००७ ते  १९ नोव्हेंबर २००७

३० मे २००८ ते ३१ जुलै २०११

पक्ष : भाजप

२० : डी. वी. सदानंद गौंडा 

कार्यकाळ : ४ ऑगस्ट २०११ ते ११ जुलै २०१२

पक्ष : भाजप

२१ : जगदीश शेट्टार

कार्यकाळ : १२ जुलै २०१२ ते  ८ मे  २०१३

पक्ष : भाजप

२२ . सिद्दारमैया

कार्यकाळ : १३ मे २०१३ ते १५ मे २०१८

पक्ष : काँग्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 12:54 pm

Web Title: list of chief ministers of karnataka from 1947 to 2018
Next Stories
1 कर्नाटक निवडणुकांनंतर सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा भडका
2 देशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार: संजय राऊत
3 वाराणसी पूल दुर्घटना – पाचवेळा पत्र पाठवूनही करण्यात आलं दुर्लक्ष
Just Now!
X