दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुंबईसहीत राज्यभरात कोसळणाऱ्या पावसासंदर्भातील. रविवार रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये कोसळणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी दुपारपर्यंत कायम राहिल्याने मुंबईचे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. दुसरी महत्वाची बातमी आहे राज्यातील प्लॅस्टीक बंदीच्या निर्णयामुळे एका रात्रीत लाखो जण बेरोजगार झाले आहेत. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…