वाघांच्या कातडय़ाची तस्करी केल्याचे आपण अनेकदा ऐकतो त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत येते. त्यामुळे वाघांची शिकार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय अशा तस्करीचा साप व अजगरांनाही मोठा फटका बसला आहे. युरोपीय फॅशन इंडस्ट्रीत साप व अजगराचे कातडे पर्स, पाकिटे व इतर वस्तू तयार करण्यासाठी वापरले जाते. यामुळे आग्नेय आशियातील साप व अजगर यांना युरोपीय फॅशन उद्योगाचा विळखाच पडला आहे.इंडोनेशियात सापाची कातडी कमावण्याच्या उद्योगात १ लाख ७५ हजार लोक आहेत त्यात दीड लाख लोक साप पकडण्याचे काम करतात, याप्रश्नावर आयटीसीचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला
कुठले साप किंवा अजगर यात वापरले जातात?
मोठय़ा आकाराचे बिनविषारी त्वचेवर ठिपके किंवा पट्टे असलेले पायथॉन क्युरटस व पायथॉन रेटिक्युलॅटस या जातींचा जास्त वापर
व्यापार करणारे देश  इंडोनेशिया  मलेशिया  व्हिएटनाम साप व अजगरांचा वापर  ज्युरोपमध्ये सापाच्या  कातडीचा वापर फॅशनेबल बॅग, बूट, बेल्ट व जॅकेट तयार करण्यासाठी होतो. ज्इटली,फ्रान्स व जर्मनी या देशात सापाच्या कातडीची सर्वाधिक आयात ज्चीनमध्ये त्याचे अन्नपदार्थ करतात व पारंपरिक औषधात वापरतात.
लेदर करन्सी ज्सापाचे कातडे कत्तलखान्यांना विकल्यास मीटरला १० ते ३०  अमेरिकी डॉलर मिळतात ज्एका लेदर हँडबॅगची किंमत असते १० हजार अमेरिकी डॉलर्स. त्यात वापरलेले असते एक ते तीन मीटर कातडे, तीन ते चार मीटर कातडय़ाला जास्त मागणी ज्साप व अजगरांची शिकार करणाऱ्यांना दर हँडबॅगच्या किंमतीमागे मिळते ०.५ टक्के रक्कम साप व अजगर यांच्या कातडीचा बेकायदा व्यापार होत असून त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. युरोपातील फॅशन  उद्योगाने बेकायदा कातडय़ांपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री टाळावी. अ‍ॅलेक्झांडर कॅस्टरीन, प्रमुख ट्रेड अँड इनव्हिरॉनमेंट