News Flash

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना

युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांकडून तपास सुरु.

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत होणाऱ्या आंदोलनांचे स्वरुप उग्र, हिंसक आहे. व्हाइट हाऊसबाहेर आंदोलन सुरु असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला होता. पॅरिस, सिडनी, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध नोंदवला.

नेमकं काय आहे प्रकरण

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलनं सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 7:51 am

Web Title: mahatma gandhis statue outside the indian embassy in washington dc desecrated dmp 82
Next Stories
1 रेल्वेमंत्री गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी
2 चिनी विमान कंपन्यांना अमेरिकेत बंदी
3 देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण
Just Now!
X