मोदी ५०० ठिकाणी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार’ प्रचाराला देशभरातील ५०० ठिकाणांहून पाठिंबा मिळाला असून मोदी ३१ मार्च रोजी जनतेशी संवाद साधणार आहेत.

सदर प्रचाराचे आता जनचळवळीमध्ये रूपांतर झाले आहे, कारण मै भी चौकादार हॅशटॅग २० लाख वेळा ट्वीट झाला आहे, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आपण एकटेच नाही असे सांगून मोदी यांनी आपल्या समर्थकांना मै भी चौकीदार मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपचे नेते आणि घटक पक्ष, व्यावसायिक, शेतकरी आदींशी संवाद साधणार आहेत, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ‘चौकीदार चोर है’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे त्याला विरोध करण्यासाठी मै भी चौकीदार मोहीम सुरू करण्यात आली आहे का, असे विचारले असता रविशंकर प्रसाद यांनी नकारार्थी उत्तर दिले.