16 January 2019

News Flash

गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेहाचे ११ तुकडे करणारा प्रियकर अटकेत

गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ११ तुकडे करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. तो मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता

प्रातिनिधिक छायाचित्र

गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ११ तुकडे करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाच्या ११ तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. गुजरातच्या सुरत या शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. झुलेखा शेख असे या हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहनवाज शेख असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. रविवारी त्याने झुलेखाला आपल्या फ्लॅटवर बोलावले. तिथे तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे ११ तुकडे करून त्यांची तो विल्हेवाट लावत होता. त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहनवाझने त्याच्या प्रेयसीची हत्या करून त्यातले काही तुकडे नष्ट केले. तिचे हात आणि पाय तो ONGC पुलावरून तो खाली फेकत होता त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांना शहनवाझच्या घरून झुलेखाचे मुंडके सापडले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शहनवाझचे लग्न झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. शहनवाझची बायको आणि झुलेखा या दोघीही शहनवाझचा फ्लॅट वापरत असत. तसेच झुलेखाने शहनवाझकडे २० हजारांची मागणी केली होती अशीही माहिती समोर येते आहे.

झुलेखा ही मूळची महाराष्ट्राची आहे. तिच्या आयुष्यात शहनवाझ आल्यावर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती गुजरातमध्ये राहू लागली. तिथे हे दोघे कायम भेटत असत. मात्र शहनवाझने तिची हत्या का केली हे समजू शकलेले नाही. झुलेखा गुजरातमध्ये आली तेव्हा ती शरीरविक्रय करत असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

First Published on April 17, 2018 5:38 pm

Web Title: man chops girlfriend into 11 pieces caught disposing body parts in surat