भारतीय वायुदलाचा ‘आयर्न फिस्ट’ सराव पोखरण येथे पार पडल्याला दोनच दिवस उलटलेले असताना याच भागात ‘आयएसआय’साठी हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून एकाला ताब्यात घेण्यात आल़े आयएसआयला भारताच्या युद्धसरावाबाबत माहिती देत असताना त्याला पकडण्यात आल़े
सुमेर खान (३४) असे त्याचे नाव असून तो संगणक तज्ज्ञ आह़े रविवारी पोखरण येथील घरातून गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. सुमेर वायुदलाच्या सरावाची माहिती आपला पाकिस्तानातील मामा रहीम यार खान याला गेल्या काही दिवसांपासून पुरवीत होता़ त्याचा हा मामा गेल्या काही वर्षांपासून आयएसआयसाठी काम करतो़
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
आयएसआयसाठी हेरगिरी करणारा अटकेत
भारतीय वायुदलाचा ‘आयर्न फिस्ट’ सराव पोखरण येथे पार पडल्याला दोनच दिवस उलटलेले असताना याच भागात ‘आयएसआय’साठी हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून एकाला ताब्यात घेण्यात आल़े आयएसआयला भारताच्या युद्धसरावाबाबत माहिती देत असताना त्याला पकडण्यात आल़े
First published on: 26-02-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man spying for isi caught in pokhran