माजी सैनिकांसंबंधी असलेली आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित ‘वन रँक वन पेन्शन’ (ओआरओपी) ही योजना सुरू करणार असल्याची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परीक्षेत अपयश आले तर खचून जाऊ नका, यश – अपयश आयुष्याचा एक भाग आहे, अपयशातून आपण शिकतो. तसेच,  जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, त्यांनी आपली कारकिर्दीची दिशा ठरवावी. पुढे काय करायचे, याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा. देशभरात उष्णतेची लाट असून नागरिकांनी याकाळात स्वत:ची व मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी. सुट्टीच्या कालावधीत तुम्ही फिरायला गेला असाल त्यावेळची अनुभव, फोटो आम्हाला पाठवावे, निवडक अनुभव व फोटोंना आम्ही प्रसिद्धी देऊ असेही ते म्हणाले. जगापुढे मी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला जगातील १७७ देशांनी पाठिंबा दिल्याने आता आमची जबाबदारी आहे, की त्याला पुढे घेऊन जाणे. योग हा रोगमुक्तीचा मार्ग आहे.  त्यामुळे २१ जून रोजी जागतिक योग दिवस साजरा होईल.
पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून आरोग्य, सेवा, कृषी, विज्ञान आदी विषयांवर चर्चा केली.