News Flash

नरेंद्र मोदींना ‘जगाचा पंतप्रधान’ बनवावे; लालूप्रसाद यादव यांची खोचक टीका

नरेंद्र मोदी त्या पदावर शोभून दिसतील, असे लालूंनी आपल्या खास शैलीत सांगितले.

Lalu Prasad Yadav : राष्ट्रीय जनता दलाचे ( राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी सततच्या परदेश दौऱ्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे ( राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी सततच्या परदेश दौऱ्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी हे आता ‘एनआरआय’ बनले आहेत. त्यामुळे जागतिक नेत्यांनी मोदींसाठी जगाचा पंतप्रधान असे पद निर्माण करावे, अशा शब्दांत लालूंनी मोदींवर टीका केली. चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. मात्र, ते बहुतांश वेळ भारताबाहेरच असतात. त्यामुळे मी जागतिक नेत्यांना विनंती करतो की, त्यांच्यासाठी जागतिक पंतप्रधानाचे पद तयार करावे. नरेंद्र मोदी त्या पदावर शोभून दिसतील, असे लालूंनी आपल्या खास शैलीत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 2:51 pm

Web Title: modi has become nri should become world pm says lalu prasad
Next Stories
1 मिग-२७ विमान घरावर कोसळले; तीन जखमी
2 चीनचा डाव उलटविण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन
3 गुलबर्ग सोसायटी जळीतकांड प्रकरणी शिक्षेची सुनावणी शुक्रवारी
Just Now!
X