News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

2019 निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, व्हिडिओकॉन प्रकरणात चंदा कोचर दोषी आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..

– 2019 निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, युपीएला मिळणार १५० हून कमी जागा – सर्वे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळणार की कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील या प्रश्नाचं उत्तर २०१९ लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहे. केंद्रात कोणाचं सरकार येईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान टाइम्स नाऊ-व्हीएमआरने केलेल्या सर्वेनुसार भाजपाला उत्तर प्रदेशात तगडं आव्हान मिळणार आहे. मात्र याची भरपाई महाराष्ट्र, पश्चिम बंगालसारख्या राज्यात होताना दिसत आहे. वाचा सविस्तर..

– राज ठाकरे यांच्यामागे हजारो मतं, आघाडीत आले तर फायदाच – छगन भुजबळ

सध्या राजकीय वर्तुळक्षेत्रात राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. अद्याप दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिला नसला तरी यावर नेते भाष्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीत आले तर फायदाच होईल असं मत व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना आघाडीत घेण्याला समर्थनच दिलं आहे.. वाचा सविस्तर …

–  व्हिडिओकॉन प्रकरणात चंदा कोचर दोषी, बँकेच्या अंतर्गत चौकशीचा निष्कर्ष

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. पदावर असताना चंदा कोचर यांनी बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन केले असे चौकशी अहवालात म्हटले आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या.. वाचा सविस्तर…

–  ‘आपण राम आणि कृष्णाचे भक्त…धुम्रपान सोडा’, रामदेव बाबांचं कुंभ मेळ्यातील साधूंना आवाहन

योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संत आणि साधूंना धुम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. ‘आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धुम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता ? आपण धुम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे’, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.. वाचा सविस्तर…

– Spot-fixing scandal: पोलिसांनी कुटुंबाला गोवण्याची धमकी दिल्यानेच केला होता गुन्हा कबूल – श्रीसंत

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने आजन्म बंदी ठोठावलेला भारतीय क्रिकेटपटू श्रीसंत याने पोलिसांच्या भीतीने आपण गुन्हा कबूल केल्याचा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसंच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचं सांगितलं.. वाचा सविस्तर…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:58 am

Web Title: morning bulletin important news lok sabha polls survey chanda kochar saked and other news
Next Stories
1 विधानसभा पोटनिवडणूक: रामगडमध्ये काँग्रेसचा तर जिंदमध्ये भाजपाचा विजय
2 राम मंदिर वाद: अयोध्येतील ६७ एकर जागेसंदर्भात काय होती वाजपेयींची भूमिका?
3 एकदा खुर्चीवरून उठल्यानंतर वकिलांशी बोलत नाही, सरन्यायाधीशांनी सुनावले
Just Now!
X