News Flash

प्रेमप्रकरणातून मुस्लिम युवकाची हिंदू कुटुंबाकडून हत्या

हिंदू महिलेच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे, या सगळ्या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत आहेत

प्रातिनिधिक छायाचित्र

हिंदू महिलेच्या कुटुंबाने एका मुस्लिम युवकाची हत्या केल्याचा आरोप होतो आहे. मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर ही माहिती समोर आली आहे. एका हिंदू मुलीचे सैफ अली या २२ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास अली या महिलेला भेटायला रामपुरा बस्ती या ठिकाणी गेला. महिलेच्या कुटुंबीयांना ही माहिती मिळताच त्यांनी या मुस्लिम युवकाला पकडले आणि त्याला अमानुष मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अलीला हिंदू महिलेच्या कुटुंबीयांनी पकडले. त्याला ते करणी इंडस्ट्रीयल भागात घेऊन गेले आणि तिथे त्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. या मुलाला बेदम मारहाण करण्याचा कटच या सगळ्यांनी आखला होता असेच स्पष्ट होत असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अलीच्या पाय या हिंदू महिलेच्या कुटुंबीयांनी लाठ्या काठ्यांनी जायबंदी केले. त्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर त्याला सांडपाण्यात फेकले. हा सगळा प्रकार एका माणसाने पाहिला त्यानंतर प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचले त्यांनी अलीला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र अलीचे पाय गंभीर रित्या जायबंदी झाले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली मात्र उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शव विच्छेदन अहवाल हाती मिळाल्याशिवाय मृत्यू नेमका कशामुळे झाला ते समजू शकणार नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बंटी, शिव माली, राजा सोनार, गोपाळ खाटी, बबलु माली या सगळ्यांविरोधात FIR दाखल केला आहे. या सगळ्यांपैकी बंटी हा हिंदू महिलेचा भाऊ आहे. या सगळ्यांपैकी बंटीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशीही माहिती समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:15 am

Web Title: muslim man killed by hindu womans family in bikaner over love affair say police
Next Stories
1 ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही स्तुती केली तरीही भाजपासोबत हात मिळवणार नाही’
2 दहाव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या भामट्याला सातव्या पत्नीच्या तक्रारीनंतर अटक
3 दाऊदची माहिती मिळविण्यात पोलीस अपयशी
Just Now!
X