अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट प्रथांच्या उच्चाटनासाठी आजन्म प्रयत्न करणारे डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचे नाव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेल्या या वर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आह़े  ऑगस्ट २०१२ मध्ये दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांना मरणोत्तर देण्यात येणारा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असणार आह़े  
याशिवाय बलात्कारविरोधी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल सुचविणाऱ्या समितीचे प्रमुख माजी न्या़ ज़े एस़  वर्मा यांच्याही नावाचा यादीत समावेश  आह़े. ही संभाव्य नावांची यादी आता पंतप्रधान कार्यालयाकडे संमतीसाठी पाठविण्यात येईल आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनातून अंतिम नावांची घोषणा होणार आह़े  गृहमंत्रालयाने तयार केलेल्या यादीत कायदा, नोकरशहा, चित्रपट, क्रीडा, वैद्यक आणि नागरी क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या १३३ मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
विविध राज्य शासन आणि मान्यवर व्यक्तींनी केलेल्या शिफारसींमधून केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही यादी तयार केली आह़े पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात, ‘पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री’ या तीन विभागांमध्ये करण्यात येत़े
डब्यूएसए क्रमवारीत पहिल्या दहा जणांमध्ये स्थान मिळविणारी २२ वर्षीय दीपिका पल्लिकल हिचाही या यादीत समावेश आह़े  पद्म पुरस्कारांच्या यादीत नाव असणारी ही सर्वात तरुण व्यक्ती आह़े  तसेच क्रिकेटपटू युवराज सिंग, टेनिसपटू लिएंडर पेस, अभियन क्षेत्रातील मिथुन चक्रवर्ती, परेश रावल, कमल हसन, विद्या बालन, गायिका अलका याज्ञिक, परवीन सुल्ताना आदी अनेक मान्यवरांची नावे यात समाविष्ट करण्यात आली आहेत.