भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर रेसकोर्स मैदानावर उतरविण्यास लष्कराने अखेरच्या क्षणी परवानगी नाकारली त्यामागे केंद्र सरकारचे कटकारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. येथे एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी मोदी येणार होते.ब्रिगेड परेड मैदानावर बुधवारी मोदी यांची जाहीर सभा होणार होती. मात्र लष्कराने त्यांचे हेलिकॉप्टर रेसकोर्स मैदानावर उतरविण्यास नकार दिला, असे पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी सांगितले. रेसकोर्स मैदानाचा वापर करण्याची अनुमती केवळ राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनाच आहे, राजकीय व्यक्तीला नाही, असे लष्कराने म्हटल्याचे सिन्हा यांनी सांगितले. हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी देता येणार नसल्याची पूर्वकल्पना दोन-तीन दिवस अगोदर दिली असती तर आम्हाला अन्य व्यवस्था करता आली असती असे ते म्हणाले.