अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्नीच्या एका फोटोमुळे अडचणीत आले आहेत. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा नग्न अवस्थेतील फोटो प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या संभाव्य फर्स्ट लेडीला तुम्ही असे कधीच पाहिले नसेल, असे या फोटोवर म्हणण्यात आले आहे. या फोटोमध्ये मेलानिया ट्रम्प यांनी केवळ हाय हिल्स घातली आहे. १९९० मध्ये मेलानिया या मॉडेलिंग क्षेत्रात होत्या. त्याकाळात त्यांनी केलेल्या फोटोशूटमधील एक फोटो प्रसिद्ध करून ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने खळबळ उडवून दिलीये.
एका फ्रेंच मासिकासाठी १९९५ मध्ये करण्यात आलेल्या फोटोशूटमधील हा एक फोटो असून, तो दुर्मिळ असून दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला नाही, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे. फ्रेंच छायाचित्रकार अल दे बासेव्हिले यांनी हा फोटो काढलेला असून, त्याचे अधिकार संबंधित वृत्तपत्राकडे आहेत. हे फोटोशूट करण्यात आले त्यावेळी मेलानिया २५ वर्षांच्या होत्या. पॅरिस आणि इटलीमध्ये मॉडेलिंग क्षेत्रात काम केल्यानंतर काही वर्षांपूर्वीच त्या अमेरिकेत परतल्या आहेत.
या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मेलानिया ही त्याकाळातील एक यशस्वी मॉडेल होती आणि तिने विविध मासिकांसाठी त्यांच्या कव्हरपेजसाठी अनेक फोटोशूट केले आहेत. मी मेलानियाला ओळखण्याआधी तिने केलेल्या फोटोशूटमधील हा फोटो आहे. यूरोपमध्ये अशा प्रकारचे फोटो हे अत्यंत सामान्य असून, फॅशन म्हणूनच त्याच्याकडे बघितले जाते.
अल दे बासेव्हिले यांनी म्हटले आहे की, मेलानिया या खूप छान आहेत. त्यांनी फोटोशूटवेळी मला खूप सहकार्य केले होते. अशा पद्धतीने फोटो काढताना त्यांना कसलीही अडचण जाणवली नाही.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी