केरळच्या तीन वर्षीय बाळालाही लागण, कर्नाटक आणि पंजाबमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद

दिल्ली : देशात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. के रळच्या तीन वर्षीय बाळालाही लागण झाली असून एकू ण सहा नवीन रुग्णांना हा आजार झाल्याने करोनाग्रस्तांची संख्या ४५ वर गेली आहे. यातील ३ जण यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी सांगितले.

देशात रविवापर्यंत करोनाचे ३९ रुग्ण होते. त्यात सहाची भर पडली. त्यात  केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीरसह इतर राज्यांतील  रुग्णांचा समावेश आहे. के रळच्या कोच्चीतील एका तीन वर्षीय बाळाला या विषाणूची लागण झाली आहे. हे बाळ पालकांसह इटलीला गेले होते. तेथून ते दुबई मार्गे के रळच्या कोच्ची येथे आले. येथे बाळाची प्रकृती खालावल्यावर त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.  वैद्यकीय तपासणीत त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

करोनाचे रुग्ण दिल्लीत वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिल्लीत बैठक घेतली. बैठकीला दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद के जरीवाल उपस्थित होते.

यावेळी दिल्लीतील करोना विषाणूग्रस्तांसाठी उभारलेले आयसोलेशन वार्ड, डॉक्टरांची उपलब्धता, घेण्यात येणाऱ्या काळजीसह इतरही विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सगळ्याच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी के ली जात आहे. यापैकी संशयित रुग्णांना निश्चित के लेल्या रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार के ले जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सध्या प्रत्येक राज्याला करोनाबाबत विशेष दल तयार करण्याच्याही सूचना के ल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात एकही बाधित रुग्ण नाही, हे विशेष.

महाराष्ट्रात सांस्कृतिक समारंभ पुढे ढकलले

करोनाची जोखीम बघता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रत्येक महाविद्यालयातील सांस्कृतिक व इतर कार्यक्रम २० मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा अध्यादेश लवकरच काढणार असल्याचे सोमवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत प्रसिद्धीमाध्यांशी बोलताना सांगितले.

कर्नाटकातील रुग्ण बेपत्ता

दुबईहून कर्नाटकातील मंगळूरू विमानतळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे दिसल्याने त्याला वेनलॉक रुग्णालयात दाखल के ले गेले. रविवारी मध्यरात्री त्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. तेव्हा आपल्याला विषाणूचा संसर्ग नसल्याचे सांगत त्याने येथून खासगी रुग्णालयात उपचार घेणार असल्याचे म्हटले. दरम्यान सोमवारी त्याने कोणालाही न सांगता पलायन केले . त्यानंतर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांना भ्रमणध्वनी करत घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य बघत रुग्णाला शोधण्यासाठी जिल्ह्य़ात हायअ‍ॅलर्ट देण्यात आला.

सचिवांकडून आढावा

केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व राज्यांनी यासंदर्भात केलेल्या तयारी आणि उपाययोजनांसंदर्भात आढावा घेतला. त्यात महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी येथील प्रत्येक जिल्ह्य़ात विलगीकरण कक्ष स्थापित केल्याचे सांगत विदेशातून येणाऱ्या विमाने, जहाजांवरील प्रवाशांची चाचणी होत असल्याचे सांगितले. लोकांनी स्वच्छतेसंदर्भात काळजी घ्यावी. प्रशासनाने आवश्यक औषधे, वैद्यकीय तज्ज्ञ, विलगीकरण कक्ष, आवश्यक मास्क यांची उपलब्धता करावी. हवाई, जल किंवा भूपृष्ठ मार्गावरील आगमन स्थानकांवर परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या आवश्यक चाचण्या करण्यात याव्यात, अशा सूचना गौबा यांनी याप्रसंगी दिल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत २८० जणांपैकी २७३ जणांच्या करोना विषाणू चाचण्या निगेटीव्ह असून सात जणांचे अहवाल यायचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यत विलगीकरण कक्ष कार्यान्वित असून येथे ४९६ खाटांची सोय आहे. येथे आवश्यक व्हेंटिलेटरही असल्याचे मेहता यांनी याप्रसंगी सांगितले.