News Flash

रशियन लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका व्यक्तीवर साइड इफेक्ट

भारतात 'या' लशीचे दहाकोटी डोस उपलब्ध होणार...

‘स्पुटनिक व्ही’ लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका स्वयंसेवकामध्ये साइड इफेक्ट आढळून आले, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली. अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना असे या साइड इफेक्टचे स्वरुप होते. ‘द मॉस्को टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.

‘स्पुटनिक व्ही’ लशीचे पहिल्या दोन फेजच्या चाचणीचे निष्कर्ष लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. पहिल्या दोन फेजमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर कुठलेही गंभीर साइडइफेक्ट आढळून आले नाहीत तसेच सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात करोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असे लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.

मोठी बातमी – रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस, या कंपनी बरोबर केला करार

“जवळपास १४ टक्के लोकांनी अशक्तपणा आणि स्नायुंमध्ये वेदनेची तक्रार केली. २४ तासांसाठी त्यांना हा त्रास जाणवला तसेच शरीराचे तपामान सुद्धा वाढले” असे तास न्यूज एजन्सीने मुराश्को यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

लशी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत मोठी घोषणा

४० हजारपैकी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त जणांना या लशीचे डोस देण्यात आले आहेत. तिसऱ्या फेजमध्ये ४० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येईल असे रशियाने जाहीर केले होते.

दरम्यान ही लस आता भारतात उपलब्ध होणार आहे. रशियाने डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केला आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने (RDIF) ही माहिती दिली. डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे.लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे RDIF ने सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:57 pm

Web Title: one in seven volunteers report side effects after taking sputnik v dmp 82
Next Stories
1 “मुंबईत वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का?,” प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेत संतप्त सवाल
2 चीन शेजारी देश असल्यानं आपण सावध राहायला हवं होतं; आझाद यांनी मोदी सरकारला सुनावलं
3 चांगलं लक्षण! दिल्लीत तीन पैकी एका व्यक्तीच्या शरीरात कोविड अँटीबॉडीज
Just Now!
X