News Flash

आइनस्टाइनच्या समीकरणात इतर वैज्ञानिकांचाही वाटा

आइनस्टाइनच्या इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर या समीकरणाच्या निर्मितीत ऑस्ट्रियातील फार प्रसिद्ध नसलेल्या वैज्ञानिकांचाही सहभाग होता असा दावा अमेरिकी वैज्ञानिकांनी केला आहे. युरोपियन फिजिकल

| January 30, 2013 12:15 pm

आइनस्टाइनच्या इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर या समीकरणाच्या निर्मितीत ऑस्ट्रियातील फार प्रसिद्ध नसलेल्या वैज्ञानिकांचाही सहभाग होता असा दावा अमेरिकी वैज्ञानिकांनी केला आहे. युरोपियन फिजिकल जर्नल (एच) मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार ऑस्ट्रियाचे भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक हॅसेनोरल यांनी आइनस्टाइनच्या या समीकरणात मोठी भूमिका पार पाडली होती, पण त्याला त्याचे श्रेय दिले गेले नाही. पेनसिल्वानियातील हार्वर्ड कॉलेजचे स्टीफन बॉगन व न्यूजर्सीच्या प्रिन्स्टन विद्यापीठाचे टोनी रॉथमन यांनी असा दावा केला की, इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर या समीकरणाच्या निर्मितीत हॅसेनोरेल यांचा वाटा होता.
विज्ञान तत्त्वज्ञ थॉमस कुन यांच्या मते वैज्ञानिक प्रगती ही अनेक टप्प्यात होत असते ती वैज्ञानिकांच्या गटांमध्ये घडणाऱ्या सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रसंगांवरही अवलंबून असते, या कल्पनेनुसार वस्तुमान व ऊर्जा यांचा संबंध हा अचानक हॅसनोरल यांनी शोधला असेही नाही, तसेच आइनस्टाइनला १९०५ मध्ये आपोआप तो संबंध सापडला असे नाही परंतु त्याने एकटय़ानेच तो शोधला असा सर्वसाधारण विश्वास आहे. कृष्णवस्तू प्रारणांबाबत हॅसनोरेल या ऑस्ट्रियन वैज्ञानिकाने जे संशोधन केले होते त्यात या समीकरणाची मुळे होती. या अभ्यासात त्याने कृष्णवस्तूच्या वस्तुमानातील बदल व त्याचे निरीक्षकासापेक्ष बदलणारे स्थान यांचा संबंध लावला होता. त्याने त्यावेळी इ इज इक्वल टू थ्री एटथ ऑफ एमसी स्क्वेअर असे समीकरण मांडले होते, पण ते चुकीचे होते. कृष्णवस्तूने बाहेर टाकलेल्या प्रारणानंतर तिच्या वस्तुमानात झालेली घट मोजण्यात अपयश आल्याने ही चूक झालेली होती. त्याने कॅव्हिटी रेडिएशनवर भर दिला होता. फ्रेंच वैज्ञानिक हेन्री पाइनकेअर व जर्मन वैज्ञानिक मॅक्स अब्राहम यांनीही जडत्वीय वस्तुमान व विद्युतचुंबकीय ऊर्जा यांचा संबंध लावून दाखवला होता. १९०५ मध्ये आइनस्टाइनने जडत्वीय वस्तुमान व विद्युतचुंबकीय ऊर्जा यांचा योग्य संबंध दाखवणारे समीकरण मांडले  पण १९११ मध्ये जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स व्हॉन लिउ याने सर्व प्रकारच्या ऊर्जा प्रकारांना ते कसे लागू पडते हे दाखवून मोठे काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:15 pm

Web Title: other scientist also contributed to einsteins equation
टॅग : Einstein,Scientist
Next Stories
1 मानवी मेंदू संशोधनासाठी एक अब्ज युरो!
2 प्रसारभारतीचे भले होणार!
3 लोकपाल विधेयक : पंतप्रधान, सोनियांचे इरादे नेक नाहीत-अण्णा
Just Now!
X