शनिवारी रात्री कालीपूजेत प्रतिबंधित असलेले फटाके उडवल्याच्या कारणावरून शहराच्या विविध भागांत ७००जणांना अटक करण्यात आली.
रात्रभर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७७१ जणांना अटक करण्यात आली. सकाळपर्यंत ही धरपकड सुरू होती. आवाजाची डेसिबल ही ध्वनिमर्यादा ओलांडणारे फटाके उडवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. चॉकलेट बॉम्ब व इतर काही फटाके उडवल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांमुळे वृद्ध, मुले, स्त्रिया, पुरुष या सर्वानाच त्रास होतो. प्रसंगी कायमचा बहिरेपणा येतो. या वेळी मोठय़ा प्रमाणात फटाके जप्त करण्यात आले. दिवाळीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी खास देखरेख ठेवली होती.