News Flash

जम्मू-काश्मीर: सणांच्या काळात हिंदुबहुल भागात पाकिस्तानचा घातपाताचा कट – गुप्तचर यंत्रणा

दहशतवाद्यांना देण्यात येत आहे विशेष प्रशिक्षण

(संग्रहित छायाचित्र)

धार्मिक दंगलीच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानकडू जम्मू आणि काश्मीरमधील हिंदुबहुल भागात सणांच्या काळात घातपाताचा कट रचण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिलं आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार अल बद्र आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील हिंदुबहुल भागात हल्ल्यांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. या आठवड्यात भारतीय लष्कराने पीओकेतून जम्मू आणि काश्मीरमध्ये दोनदा झालेल्या हत्याऱ्यांच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

भारतीय लष्कराने सोमवारी सीमेवरील तांगधर सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईत एक बॅग हस्तगत केली होती. यामध्ये पाच पिस्तुलं, १० मॅगझीन, १३८ गोळ्या आढळून आल्या होत्या. तर ११ ऑक्टोबर रोजी केरन सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईत दोन बॅगांमध्ये गोळ्या, आठ मॅगझीन, २४० एके ४७ रायफल्स आढळून आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 10:07 am

Web Title: pakistan plans to hit hindu dominated areas in jk during festive season infro from intel sources aau 85
Next Stories
1 राहुल गांधींनी शेलक्या शब्दांत घेतला मोदी सरकारचा समाचार; म्हणाले…
2 भारत बायोटेकच्या करोना लशीसंबंधी महत्त्वाची अपडेट; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
3 संकट कायम! शंभर दिवसानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो करोना; ICMRची महत्त्वाची माहिती
Just Now!
X