14 December 2017

News Flash

पंडित रविशंकर यांचा ‘ग्रॅमी’ सोहळ्यात दुहेरी सन्मान!

.पंडित रविशंकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या 'द लिव्हिंग रुम सेशन्स

लॉस एंजेलिस | Updated: February 11, 2013 11:19 AM

दिवंगत प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचा यंदाच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कार सोहळ्यात दुहेरी सन्मान करण्यात आला. पंडित रविशंकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या ‘द लिव्हिंग रुम सेशन्स पार्ट १’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत गटात ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले.
पंडितजींची मुलगी आणि प्रसिद्ध सतारवादक अनुष्काशंकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पंडितजीचे निधन झाले.
शनिवारी संध्याकाळी झालेल्या विशेष कार्यक्रमात अनुष्काशंकर आणि नोरा जोन्स यांनी पंडितजींना देण्यात येत असलेला जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. पंडितजींच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्या अल्बमला ग्रॅमीसाठी नामांकन मिळाल्याचेही त्यांना कळाले होते.
अनुष्काशंकर यांच्या ट्रॅव्हेलर या अल्बमलाही ग्रॅमीचे नामांकन मिळाले आहे.

First Published on February 11, 2013 11:19 am

Web Title: pandit ravi shankar wins best world music album grammy