पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ मे महिन्यात होणारी सार्वत्रिक निवडणूक उत्तर पाकिस्तानातील चित्राल येथून लढविणार असल्याचे त्यांच्या पक्षातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले.
खैबूर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल हा मतदारसंघ येतो. उद्या म्हणजेच गुरुवार, २८ मार्च रोजी मुशर्रफ हे या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरतील, असे ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगचे (एपीएमएल) नेते शाहजादा खलिद परवेझ यांनी येथे सांगितले.