देशभरात गुरूवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांनी , तर डिझेलच्या दरात ३१ पैशांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ३ रुपये ३८ पैसे आणि २ रुपये ६७ पैशांनी वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. गेल्या दोन महिन्यात देशभरात चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ग्राहकांना पेट्रोलमधील दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.