25 September 2020

News Flash

PNB case: नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीची न्यायालयीन कोठडी १७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायदंडाधिकारी कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते.

नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून भारतातून फरार आहे. त्याला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वाँड्सवर्थ तुरूंगात आहे. तेथील कायद्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यानंतर ताब्यातील कालावधी वाढवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले जात आहे. या अगोदर मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी असे संकेत दिले होते की, दोन्ही पक्ष त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्तावित पाच दिवसांच्या सुनावणीवर लवकरच तयार होऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 5:25 pm

Web Title: pnb case nirav modi remanded to custody uk court sgy 87
Next Stories
1 पत्नीनेच कापला हात, मुलाने उडवले शीर; सरकारी नोकरीसाठी निर्घृण हत्या
2 INX Media Case: चिदंबरम यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
3 पाकिस्तानी सैन्याने फेकलेले ९ ‘मोर्टार शेल’ भारतीय जवानांकडून निष्प्रभ
Just Now!
X