छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने दीड वर्षांच्या मुलीला अत्यंत क्रुर व संतपाजनक अशी वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या चिमुकलीचा दोष एवढाच होता की ती त्याला बाबा म्हणत नव्हती. म्हणून त्याने तिला सिगारटने चटके दिले. मुलीने आपल्याला बाबा म्हणावे म्हणावे म्हणून त्याने तिच्यावर दबाव देखील टाकला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.

बालोद जिल्ह्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश राय यास अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याने गुरूवारी दीड वर्षीय मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी सिगारेटने चटके दिले. एवढेच नाहीतर मुलीच्या आईला देखील मारहाण केली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवाय, आरोपीस शनिवारी दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरातून अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. अशी देखील पोलिसांनी माहिती दिली आहे.

आरोपी अविनाश राय काही दिवसांअगोदरच बालोद ठाण्यात रूजू झाला होता. दरम्यान, तो शहरातील सिवानी परिसरात महिलेच्या घरातच राहत होता. तर महिलेचा पती हा दुसऱ्या शहरात राहत असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. आरोपीने या महिलेस काही पैसे उधार दिले होते, जे मागण्यासीठी तो २४ ऑक्टोबर रोजी तिच्या घरी गेला होता. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ”त्या दिवशी रात्री तो तिच्या मुलीला मला बाबा म्हण असे म्हणून तिच्यावर दबाव आणू लागला होता. मुलगी त्याला बाबा म्हणत नसल्याने त्याने तिच्या चेहऱ्यावर, पोटावर व हातावर अनेक जागी सिगारेटने चटके दिले. यानंतर त्याने मला मारहाण करून तो फरार झाला होता.”

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. चौकशीच्या आधारावर आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात विभागीय कारवाई देखील केली जाणार आहे.