News Flash

गरिबी ही केवळ मानसिक स्थिती- राहुल गांधी

गरिबी ही केवळ मानसिक स्थिती असून, आत्मविश्वासाच्या जोरावर गरिबी हटविता येऊ शकते असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

| August 6, 2013 11:41 am

गरिबी ही केवळ मानसिक स्थिती असून, आत्मविश्वासाच्या जोरावर गरिबी हटविता येऊ शकते असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.”गरिबी ही मानसिक स्थिती असून त्याचा जेवणासारख्या भौतिक गोष्टींशी संबंध नाही. जनता स्वत:मधला आत्मविश्वास जागवणार नाही तोपर्यंत नागरिक गरिबीतून बाहेर पडणार नाहीत” असेही राहुल गांधी म्हणाले. ते अलाहाबाद येथे महिलांच्या स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात बोलत होते.
गेल्या काही दिवसात काँग्रेसजनांनी गरिबीसंदर्भात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राहुल गांधींनी याआधी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून, अशी वक्तव्ये  काँग्रेस नेत्यांनी करु नयेत अशी तंबीही दिली होती. परंतु, यावेळी खुद्द राहुल गांधींनी गरिबी ही मानसिक स्थिती असल्याचे वक्तव्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 11:41 am

Web Title: poverty is only mental condition rahul gandhi
टॅग : Poverty,Rahul Gandhi
Next Stories
1 ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ‘अ‍ॅमेझॉन’कडे
2 तेल कंपन्यांकडून इंधन दर ठरविण्याविरोधातील याचिकेवरील निर्णय राखीव
3 उत्तराखंडच्या आपत्तीत सहा हजार लोक दगावले
Just Now!
X