जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला केला आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानमधील २०० वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसत असल्याने ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानवर झालेला हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचा दावा केला जात आहे. हॅक केलेल्या वेबसाईट्सची यादीच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधील काही सरकारी वेबसाईट्सचाही समावेश आहे. हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४/०२/२०१९ कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर हॅकर्सने पोस्ट केले आहेत.

पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक सीआरपीएफच्या ताफ्यावरील बसवर धडकवून केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून सामान्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शनांच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. अशातच भारतीय हॅकर्सने पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा सायबर हल्ला केला असून २०० वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. दरम्यान याआधी शनिवारी काही हॅकर्सने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केली होती. पाकिस्तानमधील स्थानिक वृर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आल्याचे म्हटले होते. अशाच आता पुन्हा एकदा भारतीय हॅकर्सने पाकिस्तानी वेबसाईटवर डिजिटल सर्जिकल स्ट्राइक करत चांगलाच दणका दिल्याची सोशल मिडियावर चर्चा आहे.

हॅक झालेल्या पाकिस्तानमधील काही वेबसाईट्स खालील प्रमाणे

https://sindhforests.gov.pk/op.html

https://mail.sindhforests.gov.pk/op.html

https://pkha.gov.pk/op.html

https://ebidding.pkha.gov.pk/op.html

https://mail.pkha.gov.pk/op.html

http://kda.gkp.pk/op.html

http://blog.kda.gkp.pk/op.html

http://mail.kda.gkp.pk/op.html

https://kpsports.gov.pk/op.html

https://mail.kpsports.gov.pk/op.html

http://seismic.pmd.gov.pk/op.html

http://namc.pmd.gov.pk/op.html

http://rmcpunjab.pmd.gov.pk/FlightsChartFolder/op.html

http://ffd.pmd.gov.pk/modis/op.html

http://radar.pmd.gov.pk/islamabad/op.html

https://badin.opf.edu.pk/14-02-2019.php

हॅक झालेल्या वेबसाईट्सवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचे पाकिस्तानी यंत्रणाचे प्रयत्न सुरु असून काही वेबसाईट्सवर ताबा मिळवण्यात यंत्रणांना यशही आले आहे.