ब्रिटनच्या राजघराण्याच्या वंशज राणी एलिझाबेथ द्वितीय या इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचे थेट वंशज असल्याचा खळबळजनक दावा एका विदेशी इतिहासतज्ज्ञाने केलेल्या अभ्यास करण्यात आला आहे.

एका मोरोक्कन वृत्तपत्रात मार्च महिन्यांत प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, सेव्हिलीचे अरब राजे यांनी स्पेनवर राज्य केले होते. हे मुस्लिम राजे प्रेषित मोहम्मद यांच्या कन्या फातिमा यांचे वंशज आहेत. त्यानंतर या राजांच्यामार्फत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या थेट प्रेषित मोहम्मद यांच्या ४३व्या वंशज असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

मोरोक्को, अँडुलासिया आणि युरोपवर राज्य केलेल्या मुस्लिम राजे हे प्रेषित मोहम्मद यांचे वंशज असून त्यांच्या धमन्यांमध्ये त्यांचे रक्त आहे, असे अब्देल हमिद अल अवनी या लेखकाने आपल्या लेखात म्हटले आहे. मात्र, हे जर खरे असेल असे मानले तर राणी एलिझाबेथ या मोरोक्कोचे राजे चौथे मोहम्मद आणि जॉर्डनचे राजे दुसरे अब्दुल्ला यांच्या चुलत बहिण ठरु शकतात.

अरेबिक वर्तमानपत्रातील आपल्या लेखात अवनी लिहीतात की, राजकन्या डायनाच्या मृत्यूवेळी हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला होता. एका इजिप्शिअन मुस्लिम व्यक्तीमुळे गरोदर राहिली होती. दरम्यान, ब्रिटिश राजघराण्याला मुस्लिम वारसदार नको होता.

तसेच अवनी यांनी राणीच्या मागील काही वंशावळीचा दाखला देताना म्हटले आहे की, मध्ययुगात स्पेनवर राज्य करणाऱे मुस्लिम राजे हे प्रेषितांची मुलगी फातिमा यांचे वंशज होते. ११ व्या शतकातील सेव्हिलीचे राजे अबु अल कासिम मुहम्मद हे फातिमा यांच्यापासून जन्मलेले प्रेषित मोहम्मदांचे थेट वंशज होते.

अल कासिम यांनी त्यांचे स्वतःचे साम्राज्य उभे केले होते. ते १०२३ मध्ये सेव्हिलीमधील अल अंदालूसचे राज्यकर्ते होते. त्यांच्या मुलीचे नाव झायदा होते. अलमोराविड्सने अब्बासिड राज्यावर हल्ला केल्यानंतर मुस्लिम राजकन्या झायदा आणि राजा अलफान्सो चौथा हे पळून गेले होते. त्यानंतर झायदाने आपले नाव बदलून इसाबेला केले आणि ती रोमन कॅथलिकमध्ये धर्मांतरीत झाली. त्यानंतर इसाबेल आणि अलफोन्सो चौथा यांच्या मुलगा सांचा याचे रक्त केंब्रिजचा तिसरा सरदार रिचर्ड कोनिसबर्ग यांच्यामध्ये आहे. हा रिचर्ड ब्रिटनचे राजे किंग एडवर्ड तिसरे यांचा नातू आहे.

इतिहासाच्या या मांडणीद्वारे त्याने ब्रिटनच्या ९१ वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय या थेट प्रेषित मोहम्मद यांच्या वंशज असल्याचा दावा केला आहे.