News Flash

पत्रकारांच्या प्रश्नावर राहुल गांधी संतप्त

पत्रकारांनी राहुल यांना तुम्ही केवळ छायाचित्र काढण्याची संधी म्हणून याठिकाणी भेट दिलीत का, असा प्रश्न विचारला.

Rahul Gandhi , Haryana, Attack on Dalit family, Loskatta, Loksatta news, Marathi, Marathi news
जितेंद्र हे दलित समाजातील असून काल पहाटे त्यांच्या कुटुंबावर गावातील उच्चवर्णीय समाजाकडून हल्ला करण्यात आला होता.

हरियाणात जातीय वादातून करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या जितेंद्र यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी भेट घेतली. जितेंद्र हे दलित समाजातील असून काल पहाटे त्यांच्या कुटुंबावर गावातील उच्चवर्णीय समाजाकडून हल्ला करण्यात आला होता. यावेळी राजपूत समाजातील काहीजणांनी जितेंद्र कुटुंबासह घरात असताना त्यांचे घर बाहेरून पेटवून दिले होते. यामध्ये त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता, तर त्यांची बायको आणि ते स्वत: जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज जितेंद्र यांची भेट घेतली. यावेळी राहुल यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा सर्व वाद नेमका कशामुळे निर्माण झाला याची माहिती घेतली. यावेळी पत्रकारांनी राहुल यांना तुम्ही केवळ छायाचित्र काढण्याची संधी म्हणून याठिकाणी भेट दिलीत का, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी आक्रमक झालेले दिसले. तुम्हाला ही केवळ छायाचित्र काढण्याची संधी आहे, असे म्हणायचे आहे का?, या देशात सर्वत्रच लोक मरत आहेत आणि तुम्हाला ही छायाचित्र काढण्याची संधी वाटते. हे वक्तव्य केवळ माझ्यासाठी नाही तर जे कुटूंब सध्या यातना भोगत आहे, त्यांच्यासाठी खूपच अपमानास्पद असल्याचे राहुल यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 2:16 pm

Web Title: rahul gandhi slams photo op allegations says it is insulting
टॅग : Haryana,Rahul Gandhi
Next Stories
1 बारामुल्लामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, तीन जवान जखमी
2 क्लॉक बॉम्ब बनविल्याचा आरोप असलेल्या अहमदचे शिक्षणासाठी कतारला स्थलांतर
3 द्विपक्षीय संबंध सुधारण्यात भारताचा प्रतिसाद निराशाजनक- शरीफ
Just Now!
X