News Flash

८० वर्षाच्या वृद्धेची हत्या, चांदीचे कडे हवेत म्हणून पायही कापले

पोलिसांनी याप्रकरणी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

८० वर्षांच्या एका वृद्धेची अज्ञात लुटारूंनी हत्या केली. त्यानंतर तिच्या पायात असलेले चांदीचे कडे निघत नव्हते त्यामुळे या लुटारूंनी वृद्धेचे पाय कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील छोटा उदेपूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ही वृद्धा तिच्या घरी एकटीच होती अशी माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

८० वर्षांची ही वृद्धा जेव्हा घरात एकटीच होती तेव्हा तिथे लुटारू आले. त्यानंतर त्यांनी महिलेचा गळा चिरला. महिलेची हत्या केल्यानंतर त्यांनी घरात लूट केली. यानंतर या चोरट्यांची नजर महिलेच्या पायात असलेल्या कड्यांकडे गेली. हे कडे चोरण्यासाठी या चोरट्यांनी तिच्या मृतदेहाचे पायही कापले. त्यानंतर हे कडे घेऊन पळ काढला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच श्वान पथकाच्या मदतीनेही या चोरट्यांचा शोध घेतला जातो आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 2:29 pm

Web Title: robbers kill 80 yr old woman chop her legs to steal silver anklets
Next Stories
1 …तर तुमच्या देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करेन, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2 ऑपरेशन थिएटरमध्येच सर्जनने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
3 कुंभमेळा २०१९: प्रयागराज येथे दिगंबर आखाड्यात भीषण आग, डझनभर तंबू जळून खाक
Just Now!
X