व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन
वैज्ञानिकांनी अनेक वर्षे प्रतीक्षा असलेला ग्लूबॉल नावाच्या नवीन कणाचे अस्तित्व शोधून काढल्याचा दावा केला आहे. अणुकणांना एकत्र ठेवणाऱ्या चिकट कणांना ग्लुऑन असे म्हटले जाते. ग्लुबॉल्स हे अस्थिर असतात व त्यांचे थेट अस्तित्व जाणवत नाही, त्यांचे क्षरण होत असताना विश्लेषण केले तरच त्यांचे अस्तित्व जाणवते. ग्लुबॉल्सच्या क्षरणाची प्रक्रिया मात्र अजून पूर्णपणे समजलेली नाही.
प्रा. अँटन रेभान व फ्रेडरिक ब्रुनर या व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यात सैद्धांतिक दृष्टिकोन वापरला असून त्यातून त्यांनी ग्लुबॉलचे क्षरण कसे होते हे शोधून काढले आहे. कण त्वरणकाने केलेल्या निरीक्षणातील माहितीशी हे संशोधन जुळणारे आहे. अनेक प्रयोगात एफ ० (१७१०) हे सस्पंदन जाणवले असून ते प्रत्यक्षात ग्लुबॉल असल्याचे दिसून आले आहे. आणखी प्रयोगात्मक निष्कर्ष येत्या काही महिन्यात मिळणे अपेक्षित आहे. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामध्ये आणखी सूक्ष्म कण असतात त्यांना क्वार्क म्हणतात व क्वार्क हे शक्तिमान आण्विक बलाने एकत्र बांधलेले असतात.

रेबनन यांनी सांगितले की, कणभौतिकीमध्ये प्रत्येक बलात विशिष्ट बल कण हस्तक्षेप करीत असतात व आण्विक बलाचे हे शक्तिशाली कण म्हणजे ग्लुऑन असतात. ग्लुऑन हे फोटॉनचे गुंतागुंतीचे रूप असते. वस्तुमानरहित फोटॉन हे या विद्युतचुंबकीय बलांचे खरे कारण असते व एकूण आठ प्रकारचे ग्लुऑन मजबूत आण्विक बलामध्ये सारखीच भूमिका पार पाडत असतात. असे असले तरी त्यात एक फरक असतो तो म्हणजे ग्लुऑन हे त्यांच्याच बलांना सामोरे जातात पण फोटॉनचे तसे नसते. त्यामुळे फोटॉनच्या बंधित अवस्था नसतात पण निव्वळ ग्लुऑनशी बद्ध असलेल्या कणांमध्ये अणुबल शक्य असते. १९७२ मध्ये क्वार्क व ग्लुऑनचा सिद्धांत मांडला गेल्यानंतर मरे गेल मॅन व हॅराल्ड फ्रिश्च यांनी निव्वळ ग्लुऑनची बंधित स्थिती असण्याची शक्यता वर्तवली होती, त्याला ग्लुओनियम असे म्हणतात व आता त्याला ग्लुबॉल असे म्हटले जाऊ लागले आहे. कण त्वरणकाच्या प्रयोगात अनेक कण सापडले असून त्यात ग्लुबॉल असण्याची शक्यता आहे पण आता अप्रत्यक्षपणे मिळालेले संकेत ग्लुबॉल या कणांचे असल्याच्या शक्यतेबाबत मतभेद आहेत. हे संकेत ग्लुबॉलशिवाय क्वार्क व अँटीक्वार्क यांच्या समन्वित व्यवस्थेचे
असू शकतात. ग्लुबॉलच्या क्षरणाची स्थिती गणनात्मक पातळीवर मांडता आलेली नाही असे रेबनान यांनी सांगितले.