News Flash

होळीच्या सेलिब्रेशनदरम्यान भाजपा आमदारावर गोळीबार; रुग्णालयात दाखल

लखिमपूर येथील भाजपा कार्यालयाच्या परिसरात रंग खेळण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ही घटना घडली.

होळीनिमित्त सुरु असलेल्या सेलिब्रेशनदरम्यान भाजपाच्या एका आमदारावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील लखिमपूर येथे घडली आहे. या हल्ल्यामध्ये आमदार योगेश वर्मा हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


होळीनिमित्त आज देशभरात सर्वत्र रंग खेळले जात आहेत. मात्र, या सेलिब्रेशनदरम्यान काही अप्रिय घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, लखिमपूर येथील भाजपा कार्यालयाच्या परिसरात रंग खेळण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होळीचे हे सेलिब्रेशन रंगात आलेले असताना भाजपा आमदार योगेश वर्मा यांच्यावर काही अज्ञातांनी गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या पायाला चाटून गेली. या घटनेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

दरम्यान, किरकोळ जखमी झालेल्या आमदार वर्मा यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता धोका टळला आहे. मात्र, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. राजकीय वैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रंग खेळताना तरुणांकडून हुल्लडबाजीचेही अनेक प्रकार घडतात. पुण्यात अशा प्रकारे हुल्लडबाजी करीत महिलांवर पाण्याचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या तरुणांची आजची धुळवड ही पोलीस ठाण्यात बसूनच साजरी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 4:36 pm

Web Title: sensation due to firing on bjp mla during holi celebration
Next Stories
1 निवडणूक न लढता पंतप्रधान होण्याचा मायावतींना विश्वास, कार्यकर्त्यांना दिला संदेश
2 पाकिस्तानी नागरिकांपेक्षा भारतीय जास्त उदास, संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल
3 आफ्रिकेत चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत, १८० ठार; हजारो बेपत्ता
Just Now!
X