23 September 2020

News Flash

मल्लिकार्जुन खर्गेंनी सुषमा स्वराज यांना विचारलेले सात प्रश्न

कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विचारलेले सात प्रश्न...

| August 12, 2015 02:35 am

कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विचारलेले सात प्रश्न…
१. ललित मोदी प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि इंग्लंडमधील अधिकाऱयांमध्ये झालेला पत्रव्यवहार केंद्र सरकारकडून उघड का केला जात नाही?
२. ललित मोदी भारतीय नागरिक असल्यामुळे त्यांना पोर्तुगालला जायचे असेल, तर त्यांनी इंग्लंडमधील भारतीय दूतावासाकडे जाऊन तेथून रितसर परवानगी घ्यावी, अशी सूचना का करण्यात आली नाही?
३. ललित मोदींनी भारतात परतावे, या अटींवर त्यांना पोर्तुगालला जाण्याची परवानगी द्यावी, अशी अट का घालण्यात आली नाही?
४. ललित मोदी यांच्या पासपोर्टसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात परराष्ट्र मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका का केली नाही?
५. ललित मोदी यांच्यासंदर्भातील फायलींवर परराष्ट्र मंत्रालयात काय टिप्पणी करण्यात आली आहे, याची माहिती उघड का करण्यात येत नाही?
६. सक्तवसुली संचालनालयाने ललित मोदींवर गुन्हे दाखल केलेले असताना इंग्लंडने ललित मोदींना ‘रेसिडन्सी परमिट’ दिले आहे. त्याला परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप का घेतला नाही?
७. भारतात परतल्यावर आपल्या जिवाला धोका आहे, असे ललित मोदी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार ललित मोदींना भारतात सुरक्षा देऊ शकत नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2015 2:35 am

Web Title: seven question by mallikarjun kharge to sushma swaraj
Next Stories
1 मानवतेने मदत केल्यावर ललित मोदींना कायद्याने परतण्यास का सांगितले नाही – खर्गेंचा सवाल
2 गोंधळात कामकाज रेटण्यावरून अडवाणी नाराज
3 मॅगी प्रकरणी ६४० कोटींच्या भरपाईची ‘नेस्ले’कडे मागणी
Just Now!
X