News Flash

मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; पती, पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलाची केली हत्या

मृत महिलेच्या १० वर्षीय मुलीवरही केला बलात्कार

मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी एका ३८ वर्षीय इसमाने एका विवाहित जोडप्याची निघृण हत्या केली आणि त्यानंतर त्याने महिलेच्या मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आरोपीने हल्ल्यामध्ये लहान मुलाची हत्या केली आहे. हा सर्व प्रकार आझमगडमध्ये घडला आहे.

आठवडाभरापूर्वी मुबारखपूर परिसरामध्ये एक विवाहित जोडपे आणि त्यांचा लहान मुलगा घरामध्ये मृतअवस्थेत अढळले होते. याच घरातील दोन मुले गंभीररित्या जखमी अवस्थेत अढळून आली होती. या प्रकरणामध्यो पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे नसिरुद्दीन नावाच्या इसमाला अटक केली आहे. चौकशीदरम्यान याआधीही आपण अशाप्रकारे हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये गुन्हे केल्याची कबुली नसिरुद्दीने पोलिसांना दिली आहे. ‘मुबारखपूरमधील ३० वर्षीय महिलेचा, तिच्या पतीचा आणि चार वर्षाच्या मुलाची आपणच हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर या महिलेच्या मृतदेहाशी मी शरीरसंबंध ठेवले होते. तसेच या महिलेच्या १० वर्षाच्या मुलीवरही मी बलात्कार केला होता,’ अशी कबुली नसिरुद्दीनने दिली आहे.

आझमगडचे पोलिस अधिक्षक त्रिवेणी सिंग यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. “या महिलेची हत्या केल्यानंतर तो तीन तास घरामध्येच होता. त्याने मृतदेहाबरोबर अनेकदा शरीरसंबंध ठेवले. याचा त्याने व्हिडिओही शूट केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ स्वत:च्या वहिनीलाही दाखवला. त्याने चौकशीदरम्यान उत्तेजक औषधे घेत असल्याची कबुलीही दिली. तसेच हा गुन्हा केल्यानंतर शरीरसंबंध ठेवण्याच्या तयारीने त्याने स्वत:जवळ कंडोम ठेवल्याचीही महिती दिली. चाकू आणि अवजड सामानाने तो हल्ला करायचा असंही चौकशी दरम्यान स्पष्ट झालं आहे,” अशी माहिती सिंग यांनी दिली.

२४ नोव्हेंबर रोजी रात्री नसिरुद्दीन या महिलेच्या घरी गेला. त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. त्याने या महिलेच्या ३५ वर्षीय पतीची हत्या केली. त्यानंतर त्याने या महिलेची आणि तिच्या लहान मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याने या मृतदेहबरोबर शरीरसंबंध ठेवले. हे सर्व काही तीन तास सुरु होते. घरातून निघण्याआधी त्याने दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेल्या या महिलेच्या १० वर्षीय मुलीचा बलात्कार केला आणि चार वर्षाच्या मुलाला गंभीर जखमी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 10:28 am

Web Title: sex maniac kills couple in sleep rapes womans corpse their 10 year old daughter arrested scsg 91
Next Stories
1 पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; १००० किलोची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता
2 सरकारी उद्योगांच्या विक्रीला विरोध; काँग्रेसच्या आमदाराने कापला स्वतःचा हात
3 Chandrayan2: आपल्या ऑर्बिटरनेच आधी विक्रम लँडरला शोधले; इस्रोने फेटाळला नासाचा दावा