12 December 2019

News Flash

सियाचीनमध्ये हिमस्खलन; चार जवानांसह सहा मृत्युमुखी

सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन गस्त घालणारे लष्कराचे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले.

नवी दिल्ली : सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन गस्त घालणारे लष्कराचे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यात चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाला.

सियाचीनच्या उत्तरेकडील भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला हिमस्खलन झाले असून, हे ठिकाण १८ हजार फूट उंचीवर आहे. डोग्रा रेजिमेंटचे सहा जवान आणि दोन हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यातील चार जवान आणि दोन हमालांचा मृत्यू झाला.

सैनिकांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. सियाचीन ही जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. शत्रूपेक्षाही येथे जवानांचा सामना वातावरणाशी असतो. हिवाळ्यात सियाचीनमध्ये हिमस्खलन होण्याचे प्रकार होत असून तेथील तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंतही जाते.

First Published on November 19, 2019 2:41 am

Web Title: siachen avalanche soldiers six died akp 94
Just Now!
X