News Flash

मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर

जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो अबे यांना पद्मविभूषण पुरस्कार

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्यांच्यासोबतच सामाजिक कार्याबद्दल गिरीश प्रभुणे यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय, साहित्याबद्दल नामदेव कांबळे यांना, कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे यांना, उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर व्यापार व उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यासोबतच कला क्षेत्रात दिवंगत गायक एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो अबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 10:05 pm

Web Title: sindhutai sapkal awarded padmashree along with 5 more in maharashtra japan shinzo abe also rewarded vjb 91
Next Stories
1 “भारतीय सैन्य सीमांचे रक्षण करण्यास सक्षम”; राष्ट्रपतींचा चीनला सूचक इशारा
2 नेताजींच्या फोटोवरुन वाद : राष्ट्रपती भवनातील फोटोमधील ‘ती’ व्यक्ती कोण?; केंद्राने दिलं स्पष्टीकरण
3 प्रसिद्ध अभिनेत्री सापडली मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय
Just Now!
X