News Flash

जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प

रामबाण जिल्ह्य़ातील पंथाल भागात दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बुधवारी काही तासांपासून ठप्प झाला होता.

| September 4, 2014 03:43 am

रामबाण जिल्ह्य़ातील पंथाल भागात दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बुधवारी काही तासांपासून ठप्प झाला होता. पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे ३०० किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील वाहतूक खोळंबली. महामार्गावर अनेक तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. सकाळी नऊच्या सुमारास रस्त्यावरील दगड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:43 am

Web Title: six killed as flash flood throws normal life out of gear in jammu and kashmir
Next Stories
1 पाकिस्तानात प्रभाव वाढविण्यास ‘आयएसआयएस’प्रयत्नशील
2 शारदा चीटफंड तपास अंतिम टप्प्यात
3 नित्यानंदच्या अडचणी वाढल्या