हिमाचल प्रदेशमधील सिमलापासून सुमारे ७० किमी दूर सोलन-राजगड येथे नईनेती ठिकाणी एका खोल दरीत खासगी प्रवासी बस कोसळून झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मानव येथून राजगड येथे जात होती. त्याचवेळी ही बस दरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनाही माहिती दिली. अजूनही मदतकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (रविवार) सकाळच्या सुमारास घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिरमौर येथील सनोराजवळ बस दरीत कोसळली. यात प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाली. मदतकार्य सुरू होईपर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती लागले होते. स्थानिकांच्या सहकार्याने पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढले. अजूनही मदतकार्य सुरू आहे.