25 February 2021

News Flash

सोमनाथ भारतींना अटक होण्याची शक्यता

दिल्ली पोलीसांचे पथक सोमनाथ भारती यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे

आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांची अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे त्यांना आजच अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीसांचे पथक सोमनाथ भारती यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. मात्र, स्वतः भारती सध्या निवासस्थानी नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सोमनाथ भारती सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे.
पत्नी लिपिका मित्रा यांनी सोमनाथ भारती यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा प्रयत्नाचाही गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदविण्यात आला आहे. सोमनाथ भारती यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि त्यांची जामीन याचिका फेटाळली. रात्री उशीरा पोलीस ठाण्यात गेल्याबद्दलही न्यायालयाने सोमनाथ भारती यांना कडक शब्दांत तंबी दिली. सत्र न्यायालयाने अटकपू्र्व जामीन याचिका फेटाळल्यानंतर सोमनाथ भारती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 12:13 pm

Web Title: somnath bharti may faces arrest as hc denies anticipatory bail
टॅग Somnath Bharti
Next Stories
1 वादानंतर माहिती विसंकेत धोरणातून सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपला वगळले
2 नेपाळमध्ये हिंसाचार ; नव्या राज्यघटनेच्या विरोधात आंदोलन पेटले
3 गोवा बॉम्बस्फोटातील फरारी संशयित पानसरे हत्येमागील मुख्य सूत्रधार?
Just Now!
X