उत्तर प्रदेशमधील आग्रा एक्स्प्रेस वेवर पुढील आठवड्यात हवाई दलाची विमाने उड्डाणाचा सराव करणार आहेत. युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हा सराव केला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा हवाई दलाची वाहतूक विमानेदेखील आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरणार आहेत. २४ ऑक्टोबरला हवाई दलाकडून हा सराव केला जाणार आहे. यंदाच्या हवाई दलाच्या सरावात एकूण २० विमानांचा समावेश असेल.

२४ ऑक्टोबरला हवाई दलाची विमाने आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरणार असल्याने २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (सेंट्रल कमांड) जनसंपर्क अधिकारी गार्गी मलिक सिन्हा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ‘आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर उन्नव जिल्ह्याजवळ हवाई दलाचा सराव होईल. यामध्ये २० विमानांचा समावेश असेल. लढाऊ आणि वाहतूक अशा दोन्ही प्रकारची विमाने स्पेशल ड्रिलमध्ये सहभागी होतील. यामध्ये मिराज २०००, जॅग्वार, सुखोई ३० आणि एएन-३२ चा समावेश असेल. यातील एएन-३२ हे वाहतूक विमान आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. २४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजल्यापासून हवाई दलाचा अभ्यास सुरु होणार आहे.

333 for pani puri at Mumbai airport
बापरे! मुंबई विमानतळावर ३३३ रुपयांना विकली जाते पाणीपुरी, व्हायरल फोटो पाहून नेटकरी चक्रावले
dombivli east marathi news, digging of busy roads
डोंबिवली पूर्वेतील वर्दळीचे रस्ते खोदल्याने नागरिक हैराण
IndiGo flights delayed after system crashes
पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल संपेनात! इंडिगोच्या यंत्रणेतील बिघाडाने उड्डाणाला तीन तासांचा विलंब
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द

गेल्या वर्षीही आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांनी सराव केला होता. मात्र त्यावेळी झालेल्या सरावात वाहतूक विमानांचा समावेश नव्हता. यंदा पहिल्यांदाच हवाई दलाच्या अशा प्रकारच्या अभ्यासात वाहतूक विमानांचा समावेश होणार आहे. गेल्या वर्षी आग्रा एक्स्प्रेस वेवर झालेल्या सरावात आठ लढाऊ विमाने सहभागी झाली होती. हवाई दलाच्या सरावाच्या पार्श्वभूमीवर २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान आग्रा एक्स्प्रेस वेवरील उन्नवजवळील अरौल ते लखनऊ दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. उत्तर प्रदेश एक्स्प्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (यूपीईआयडीए) याबद्दलची माहिती दिली आहे. या काळात वाहतूक व्यवस्थेत बदल करुन ती इतरत्र वळवण्यात येणार आहे.