वेग आणि त्याची झिंग काहिना इतकी चढली असते की, आपण किती वेगात गाडी चालवतो याचे कधी कधी भानच राहत नाही. वाहन चालवण्यासाठी कमाल वेगमर्यादा ही आखून दिली असली तरी त्याचे उल्लंघन करणारे अनेक आहेत. आपल्या देशात जर वेगमार्यादेच्या नियमाचे उल्लघंन केले तर चालकाला ३०० आणि १००० रुपयांचा दंड भरावा लागतो. जगात काही देश असे आहेत की, जिथे हा दंड इतका अधिक असतो की चालकाच्या खिशाला याचा फटका बसला नाही तर नवलच म्हणावे लागेल. बघुया कोणत्या देशात वेगामर्यादा किती आहे. तसेच वेगाचे उल्लंघन केल्यास किती दंड बसतो ते..

नॉर्वे : नॉर्वेमध्ये वेगमर्यादा ताशी ५० किलोमीटर इतकी आहे तर महामार्गावर १०० च्या वेगाने वाहाने चालवायला परवानगी आहे. पण यापेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास ५०० ते ७०० युरोपर्यंतचा दंड होऊ शकतो तर काही वेळा तुरुंगवासाची शिक्षा देखील चालकाला केली जाते.
फ्रान्स : फ्रान्समध्ये रहदारीच्या भागात ९० च्या वेगाने, तर महामार्गावर १७० किलोमीटरच्या वेगाने गाडी चाढवली तर वाहान चालक परवाना काही महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो तसेच मोठा दंडही बसू शकतो.
स्पेन : स्पेनमध्येही वाहतूकीचे नियम हे कडक आहे. शहरात ५० पेक्षा अधिक वेगाने गाडी चालवायला परवानगी नाही पण शहराबाहेर ही मर्यादा ८० किलोमीटर प्रतितास अशी देण्यात आली. जर या वेगमर्यादेपेक्षा ताशी २१ किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर तुरूंगवास किंवा मोठा दंडही होऊ शकतो.
इटली : या देशात वेगमर्यादा ही ५० ते १३० च्या आसपास आहे जर ही वेगमर्यादा ओलांडली तर या देशात वाहन परवाना रद्द होऊ शकतो. तर नेदरलँमध्येही वेगमर्यादा ओलांडल्याची शिक्षा ही कडक आहे दंड आणि वाहन परवाना रद्द होणे अशा दोन्ही शिक्षा होतात.
जर्मनी : जर्मनीत वेगमर्यादा ही ५० ते १०० किलोमीटर एवढी आहे तर महामर्गावर वेगासाठी कोणतेही बंधन नाही पण जर वेगमर्यादा ओलांडलीच तर मात्र चालकाच्या खिशाला मोठी कात्री बसतेच वरून वाहन परवाना देखील काही महिन्यांसाठी रद्द केला जातो.