News Flash

मोदींच्या सत्कारासाठी स्टेडियम नाकारले

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार करण्यासाठी प्रदेश भारतीय जनता पक्षाने ९ एप्रिलला येथील स्टेडियमची मागणी केली होती. मात्र, हे स्टेडियम देण्यास राज्यातील ममता

| April 3, 2013 03:28 am

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार करण्यासाठी प्रदेश भारतीय जनता पक्षाने ९ एप्रिलला येथील स्टेडियमची मागणी केली होती. मात्र, हे स्टेडियम देण्यास राज्यातील ममता बॅनर्जी सरकारने नकार दिला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  शहरातील प्रमुख उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी मोदी ९ एप्रिलला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एमसीसी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि भारत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:28 am

Web Title: stadium opposed to give permission to honour program of modi
Next Stories
1 लोकसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच होण्याची भाजपला खात्री
2 गुजरात विधानसभेत नवे लोकायुक्त विधेयक
3 बाबरी मशीदप्रकरणी अपिलास विलंब का?
Just Now!
X