News Flash

पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करणाऱ्या K-4 मिसाइलची सहा दिवसात दुसरी चाचणी यशस्वी

समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.

के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. मागच्या सहा दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून, त्याची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे.

समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अरिहंत वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुडयांवर या क्षेपणास्त्राची तैनाती करण्यात येईल. अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) K-4 क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

काय आहे K-4 क्षेपणास्त्राचे वैशिष्टय

– भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. K-4 त्यापैकी एक आहे. K-4 ची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे तर दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज ७०० किलोमीटर आहे.

– तीन मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.

– पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.

– आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.

– अण्वस्त्र पाणबुडयांवर K-4 क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील. सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 6:51 pm

Web Title: successfully test fired k 4 ballistic missile dmp 82
Next Stories
1 सुरक्षित शरीरसंबंधांचा आग्रह धरला म्हणून महिलेची हत्या
2 भारतात मार्केटिंगवर फेसबुकचा भर, मार्केटिंग प्रमुखपदी अविनाश पंत यांची नियुक्ती
3 कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी १० दिवसात चीन बांधणार हॉस्पिटल
Just Now!
X