06 July 2020

News Flash

लिंगनिदान जाहिराती काढून टाकण्याचे संकेतस्थळांना आदेश

गुगल इंडिया, याहू इंडिया व मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन प्रा. लि. या कंपन्यांनी लिंग निदानाच्या जाहिराती काढून टाकाव्यात किंवा रोखाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

| January 29, 2015 12:06 pm

गुगल इंडिया, याहू इंडिया व मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन प्रा. लि. या कंपन्यांनी लिंग निदानाच्या जाहिराती काढून टाकाव्यात किंवा रोखाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भारतीय कायद्यानुसार गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या जाहिराती करणे प्रतिबंधित आहे.
जर कुठल्याही सर्च इंजिनने अशा प्रकारच्या जाहिराती दिल्या असतील तर त्या मागे घ्याव्यात असा सक्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, सर्च इंजिन्सनी धोरणात्मक पान अपलोड करावे व त्यात सेवेच्या अटी व शर्ती द्याव्यात. लिंगनिदान प्रतिबंध कायदा कलम २२ अन्वये अशा जाहिराती करणे किंवा त्या पुरस्कृत करणे हा गुन्हा आहे. न्या. दीपक मिश्रा व प्रफुल्ला सी पंत यांनी सांगितले की, गुगल, याहू व मायक्रोसॉफ्ट यांनी अशा जाहिराती करू नयेत किंवा त्या पुरस्कृतही करू नयेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2015 12:06 pm

Web Title: supreme court order websites asked to block sex determination ads
Next Stories
1 उमेदवारांची माहिती जाणून घेण्यासाठी मोहीम
2 जुना तारा व त्याच्या भोवतीच्या पाच ग्रहांचा शोध
3 ‘आप’ उमेदवारांच्या बदनामीचा कट
Just Now!
X